PCMC : गृहनिर्माण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी (PCMC) महापालिकेच्या वतीने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी नोडल अधिकारी व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नियुक्ती केली आहे.

नोडल अधिकारी म्हणून भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक आणि सहाय्यक समन्वय अधिकारी म्हणून स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

PCMC : बकरी ईदची सुट्टी उद्या

शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये पालिके मार्फत विविध मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांचे घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, जलःनिसारण, कर आकारणी व कर संकलन, विद्युत व रस्त्यांची विविध कामे अशा कामकाजाबाबत कार्याभ्यस व कार्याचे मूल्यमापन करणे आवश्‍यक आहे. नोडल अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांनी कृती आराखडा तयार करून आयुक्त सिंह यांना सादर करावा, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी (PCMC) यांनी जारी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.