Pune : बसस्थानकात येऊन बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तब्ब्ल 1600 रिक्षाचांलकावर पीएमपीएमएल व आरटीओची कारवाई

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलची बसस्थानके अथवा (Pune) बसथांब्यांपासून 50 मीटर अंतरावर रिक्षाचालकांना रिक्षा थांबवता येत नाही, असा नियम असाताना देखील रिक्षाचालक नियमाकडे दुर्लक्ष करून सर्रासपणे नियम मोडतात. अशा रिक्षा चालकांवर पीएमपीएमएल प्रशासन व आरटीओ यांच्या संयुक्त पथकाकडून कारवाई केली जात आहे.त्यानुसार तीन महिन्यात  1 हजार 620 रिक्षाचालकांवर कारवाई कऱण्यात आली आहे.आत्ता पर्यंत नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करत 3 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Mulshi : उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीमुळे मुळशीमधील काही गावांचा वीज पुरवठा राहणार बंद

रिक्षा चालक पीएमपीएमएल च्या मुख्य बसस्थानकाच्या परिसरात येऊन बस प्रवाशांची वाहतूक करतात. तसेच बसचालकांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा लावत असल्याबाबतच्या तक्रारी परिवहन महामंडळाचे चालक, प्रवाशी व प्रवाशी मंचाकडून वारंवार प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे आदेशान्वये परिवहन महामंडळाच्या वाहतूक विभागाकडील पर्यवेक्षकीय सेवकांचे पथक तयार करणेत आलेले आहे. या पथकासोबत प्रादेशिक परिवहन विभागाकडील (आरटीओ) वरिष्ठ अधिकारी देखील असणार आहेत.

कसे असेल पथक  

परिवहन महामंडळाकडील 4 सेवक व 1 आरटीओ अधिकारी यांचे पुणे शहरासाठी 1 व पिंपरी-चिंचवड शहरासाठी 1 अशी दोन संयुक्त दक्षता पथके तयार करणेत आलेली असून मागील 3 महिन्यांत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल च्या मुख्य बसस्थानकांच्या 50 मीटरच्या परिसरात येवून नियम मोडणाऱ्या एकूण 1 हजार 620 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे.

त्याची  माहिती खालीलप्रमाणे ( जानेवारी 2024)

महिना दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या रिक्षांची संख्या

जानेवारी 553

फेब्रुवारी 622

मार्च 26 तारखेपर्यंत – 445

एकूण 1620

तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन कडून स्वारगेट बसस्थानकाचे परिसरात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या रिक्षा,ओला, उबेर, लक्झरी बस इ. वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 नुसार जानेवारी 2024 ते दि. 25 मार्च अखेर 530 वाहनांवर कारवाई करून वाहतूकीस अडथळा या शीर्षकाखाली एकूण रक्कम रूपये 3 लाख 32 हजार इतका दंड आकारण्यात आलेला आहे.

पीएमपीएमएल च्या बसस्थानकांच्या परिसरात रिक्षा व इतर खाजगी वाहने दिसल्यास सदरचे वाहनांवरआरटीओ पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असून अपघाताची शक्यता असल्याने रिक्षा व इतर खाजगी वाहनांनी बस स्थानकांचे परिसरात त्यांची वाहने उभी करू नयेत अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.