Pimpri : ह.भ. प.शिरिष मोरे यांच्या ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज (Pimpri) शिरिष महाराज मोरे लिखित ‘छत्रपती शिवराय समजून घेताना’ या पुस्तकाचे सुनील देवधर आणि मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपरी येथील शनिवार (दि.30 मार्च) आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडला.कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी आंबेडकर चौक, पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीला अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास सुनील देवधर,मेधा ताई कुलकर्णी श्री शिवाजी रायगड स्मारकचे सुधीर थोरात, ह.भ.प. संतोष महाराज काळोखे, नरेश गुप्ता,सेवा सारथी संस्थेचे पंकज दलाल, ओंकार मांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.डॉ. सचिन बोधनी यांनी प्रास्ताविक केले.

Pune : बसस्थानकात येऊन बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या तब्ब्ल 1600 रिक्षाचांलकावर पीएमपीएमएल व आरटीओची कारवाई

या प्रसंगी मोरे, देवधर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील शिवकार्य करणाऱ्या निवडक संस्था, व्यक्ती यांचा सन्मान करण्यात आला. ‘ मागील काही वर्षे जाणूनबुजून शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या सर्व प्रयत्नांना  ससंदर्भ उत्तरे देण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.ओढून ताणून महाराजांची प्रतिमा सेक्युलर करण्याचा प्रयत्न केला जात आहे ,त्यासाठी महाराजांच्या सैन्यातील मुसलमान सैनिकांचा आकडा फुगवून सांगितलं जातो. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे ‘ असे मत मोरे यांनी मांडले.

‘ परकीय इस्लामी आक्रमणाच्या गोष्टी ऐकल्या की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या अत्याचारातून शिवाजी महाराजांनी हिंदू जनतेची सुटका केली. स्वभाषा, स्वदेश,स्वधर्म यांची पुनर्स्थापना करून त्यांनी हिंदू संस्कृतीला पुन्हा मानाचे स्थान दिले. शिवाजी महाराजांचे अंतरंग समजून घेण्यासाठी तरुणांना या पुस्तकाचा उपयोग होईल. या पुस्तकाचा हिंदी तसेच इंग्रजी मध्ये सुद्धा अनुवाद व्हावा ‘ अशी अपेक्षा देवधर यांनी व्यक्त केली.

शुभम खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ. प.अनिकेत मोरे यांनी आभार (Pimpri) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.