Pune : पुणे ते गिरनारजी – सोमनाथ 1100 कि.मी. सायकल प्रवास फक्त 9 दिवसात पार

एमपीसी न्यूज – विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्ती समाजात ( Pune ) विधायक बदल घडवितात आणि असे व्यक्ती इतिहास घडवितात. असाच एका ध्येयाने प्रेरित झालेले उत्तम धोका यांनी सायकलवरून ही भारतातील तिर्थक्षेत्रचा प्रवास होवू शकतो असा संदेश देण्याच्या उद्देशाने अनेक साहसी मोहिमा यशस्वी केल्यानंतर या उत्तम धोका आणि आकाश राठोड ह्यांनी या वर्षी पुन्हा एकदा  पुणे ते गिरनारजी -सोमनाथ 1100 कि.मी. चा सायकल व्दारे 9 दिवसात प्रवास मोहीम पूर्ण केली आहे.

PCMC : अग्निशमन विभागाच्या वतीने 426 आस्थापनांना नोटीसा

पुणे सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी येथून  सुरु केलेली मोहिम 9 दिवसात गुजरात मधील राजकोट येथील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान गिरणारजी तिर्थक्षेत्र 1100 कि. मीटरचा प्रवास 18 जानेवारी 2024 ला पुर्ण केला. तसेच सोमनाथजी आणि गिरनारजी येथील दत्त मंदीराचाही प्रवास सायकल व्दारे पुर्ण केला.  या सायकल मोहिमेत उत्तम धोका यांच्या नेतृत्वाखाली आकाश राठोड, सुरेश पिताणी, विर उत्तम धोका  हे वॉरिअर्स सहभागी झाले होते.

दररोज 120 ते 130 किलामीटर अंतर वातावरणांच्या बदलाची परवा न करता पार करत गिरनारजी तिर्थक्षेत्र गाठले होते.  सायकल वरूनही भारतातील सर्व तिर्थक्षेत्राचा प्रवास करता येईल हा संदेश देण्याच्या उद्देशाने सायकल व्दारे तिर्थक्षेत्र प्रवासचा मानस घेतलेले उत्तम धोका यांनी आता पर्यंत सुमारे सात राज्यातील विविध तिर्थक्षेत्राचा प्रवास करून 5400 कि.मीटरचा प्रवास पुर्ण केला आहे.

आरोग्या सोबत सायकलवरून तिर्थक्षेत्राचे दर्शन घेणे असा अगळावेगळा उपक्रम 2019 मध्ये सुरु केला. प्रथम उत्तम धोका पुणे शहरातील विविध तिर्थक्षेत्र म्हणजेच दगडूशेठ मंदीर, चतुश्रृगी, पाषाण येथील शंकर मंदीर, जेजुरी आदी ठिकाणापासून सायकलिंगची सुरुवात केली. 2019 साली पुणे ते पालिताना 800 कि. मीटरचा लांबचा पल्ला सायकलवरून पुर्ण केला .

एक इतिहास घडविण्याची सुरुवात करित पुढे धोका यांनी पुणे ते शिर्डी, पुणे ते तूळजापूर , पुणे ते पंढरपूर, पुणे ते गेटवे ऑफ इंडिया, पुणे ते अंतरिक्ष पार्श्‍वनाथ जैन तिर्थ 500 किलोमीटरचा प्रवास  एकट्यानेे सायकलवरून 3 दिवसात पुर्ण केला. पुढे त्यांचा सायकल चालविणचा  विश्‍वास इतका वाढला की 2023 मध्ये तब्बल 2100 किलोमीटरचा प्रवास करीत पुणे ते सम्मेत शीखरजीचा प्रवास 17 दिवसात पुर्ण केला.

अशा प्रकारे आता पर्यंत 5400 किलोमीटरचा प्रवास केला आहे. भविष्यात भारतातील सर्वच तिर्थक्षेत्राचे दर्शन साकलवरून करणार असल्याचा दृढ निश्‍चय उत्तम धोका व त्यांच्या टीम ने केला आहे. भविष्यात पुणे ते केदारनाथ सोबत राजस्थानमधील सर्व जैन तिर्थक्षेत्राचे दर्शन सायकल व्दारे करणार असल्याचे धोका यांनी ( Pune ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.