Pune : महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक संघाची निवडणूक संपन्न

एमपीसी न्यूज – पूर्व भागातील गंज पेठ, गुरूवार पेठ, घोरपडे पेठ (Pune )या भागांतील ऐतिहासिक अशी जुनी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक संघटना, वाचनालय व ग्रंथालय यांची निवडणुक पार पडली.

या निवडणुकीत सर्वांनुमते अध्यक्षपदी शशिकांत गवळी यांची (Pune )निवड करण्यात आली. सचिवपदी सदाशिव चिल्लाळ, खजिनदारपदी ॲड. बी. एम. दरवडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर, कार्याध्यक्षपदी भुमय्या लगशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. ही संघटना गेली २० वर्षांपासून कार्यरत असून संस्थेतील ज्येष्ठ नागरिक अतिशय उत्साहाने काम करीत असतात.

Bhosari : इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत टागोर माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

पूर्व भागातील ही सर्वात मोठी ज्येष्ठ नागरिक संघटना असून ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न व अडचणी ह्या संस्थेमार्फत सोडविल्या जातात. सदर संघटना ही विविध उपक्रम वर्षभर राबवित असते. पूर्व भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत करते, सामाजिक उपक्रम राबवत असतात.

अत्यावश्यक, शैक्षणिक, रूग्ण वाहिका, वारकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तू व अन्न-धान्य वाटप अशा अनेक समाजपयोगी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. तसेच संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचे आयोजन केले जाते.

विजयी सर्व उमेदवारांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाद्वारे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.