Pune: ‘1995’  दहावीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दिमाखात संपन्न

एमपीसी न्यूज – लोहारा येथील डॉक्टर जे. जे. पंडित माध्यमिक(Pune) विद्यालयातील इयत्ता दहावी 1994-95 च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा श्री तपेश्वर मंदिर परिसरात 27 जानेवारी आयोजित करण्यात आला होता.

29 वर्षांनंतर भेटणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद (Pune)ओसंडून वाहत होता . स्नेहसंमेलन मेळाव्यासाठी  पहिली पासून ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांना लाभलेल्या सर्व गुरुजनांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले गेले होते.  कार्यक्रमाला  जवळजवळ 77 विद्यार्थी आणि 18 शिक्षकांची उपस्थिती होती.  उल्लेखनीय बाब म्हणजे 87 वर्षांच्या माजी शिक्षिका श्रीमती काकडे मॅडम कन्या शाळा लोहारा या उपस्थित होत्या.

Pune : पुणे ते गिरनारजी – सोमनाथ 1100 कि.मी. सायकल प्रवास फक्त 9 दिवसात पार

स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सावदेकर माजी मुख्याध्यापक तारखेडा,  त्याचबरोबर सरोदे, धनगर, उदार, शेळके , चौधरी, काकडे, अस्वाल, द्राक्षे, बाविस्कर , वाय बी पाटील, सोनार, काशिनाथ , सोमनाथ , एस एस पाटील, सूर्यवंशी, आणि एम. मोरे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे अतिशय नियोजनबद्ध आणि यशस्वी आयोजन माजी विद्यार्थी सुशील गीते यांच्या नेतृत्वाखालील 11 विद्यार्थ्यांच्या आयोजन समितीने केले. या समितीमध्ये माजी विद्यार्थी संजय भडके , विजय ठोसर , मृणालिनी सावदेकर, योगिता कासार, मनीषा लुंकड/शेटीया , सुनिता जैन, देविदास जाधव, अशोक लिंगायत , सुरेंद्र भोसले आणि निलेश न्हावकर यांनी  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  योगदान दिले.

स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन संजय भडके, योगिता कासार, मृणालिनी सावदेकर आणि सुनिता जैन यांनी केले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक विजय ठोसर  यांनी केले तर  आभार प्रदर्शन मनीषा लुंकड/शेटीया  यांनी केले.कार्यक्रमात मार्गदर्शन पर भाषण सावदेकर, धनगर, अस्वाल, उदार, बाविस्कर, काशिनाथ आणि सोमनाथ यांनी  केले. त्याचबरोबर  माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रतिभा चौधरी, दिलीप खोडपे, अर्चना , सुशील गीते, सुनील खरे आणि विजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.