Pune : पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार – रविंद्र धंगेकर

एमपीसी न्यूज – भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या (Pune)जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात विजय मिळविल्या नंतर आपण पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

मी कोणतीही निवडणूक लढवू शकतो. पक्षानं उद्या सांगितल तर उद्या निवडणूक लढवेन, असं देखील ते म्हणाले. पुणे लोकसभा निवडणुकीत विरोधात कोणीही उमेदवार असला तरी लढण्याची तयारी असल्याचं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी(Pune) इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.

IND-SA : के एल राहुलचे शतक: भारताचे पहिल्या डावात 245 धावा

दरम्यान, मागील 10 वर्षांपासून पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. यापूर्वी या मतदारसंघावर माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे एकहाती नेतृत्व होते. 2014 आणि 2019 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा पराभव झाला.

त्यामुळे आता हा मतदारसंघ महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (पवार गट) यांनी मागितला आहे. तर, आमचा हा पारंपरिक मतदारसंघ असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेने आगामी पुण्यातील खासदार हा आता शिवसेनेचा असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेतर्फे माजी मंत्री शाशिकांत सुतार, माजी आमदार महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नावाची चर्चा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.