IND-SA : के एल राहुलचे शतक: भारताचे पहिल्या डावात 245 धावा

एमपीसी न्यूज – भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका (IND-SA)पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताच्या के एल राहुल ने कसोटी कारकिर्दीतील 6 वे शतक झळकावले. सोबतच भारताचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला.

आफ्रिकेतील सेन्चुरियन येथील उसळत्या खेळपट्टीवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्यात भारताची एक बाजू लावून धरत के एल राहुलने कसोटी कारकिर्दीतील 8 वे शतक झळकावले. त्याने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताला पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारता आली.

Pune : अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट

सेंच्युरीयन येथील खेळपट्टी गोलंदाजांसाठी (IND-SA)अनुकूल असून चेंडू उसळी घेत स्पिन होणे ही येथील खेळपट्टीची खासियत आहे. त्यामुळे भारताने आफ्रिकेला दिलेले 245 धावांचे आव्हान समाधानकारक आहे.

भारतीय गोलंदाजीच्या पुढे आफ्रिकन फलंदाज काय कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

प्रथम गोलंदाजी करताना कासिगो रबाडा याने 5 गाडी बाद केले, तर बर्गर ने 3 विकेट काढल्या. दुसऱ्या दिवशीचा अर्ध्याहून अधिक खेळ शिल्लक आहे.

आफ्रिकेचा पहिला गाडी 11 धावांवर माघारी परतला आहे. मार्करमने 5 धावा करून पव्हेलीयनची वाट धरली. त्याला मोहम्मद सिराजने राहुलकरवी झेलबाद केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.