Pune : अजित पवार यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी (Pune)उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप ,शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी केला आहे.

त्यामुळे पुण्यात अजित पवार गटविरुद्ध भाजप, (Pune)शिंदे गट असा नवा संघर्ष सुरू झाला आहे. बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना नियमबाह्य पध्दतीने मंजूर केलेली सुमारे 800 कोटींची कामे रद्द करावीत, अन्यथा न्यायालायात जाण्याचा इशारा या सदस्यांनी दिला आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले होते.

PCMC : शहरातील रेड झोनची मोजणी होणार

मात्र, अजित पवार पालकमंत्री होताच सर्व काही बदलून गेले. दोन दिवसांपासून अजित पवार पुणे जिल्ह्यात दौरे करीत आहेत. बारामती तालुक्यातील मेळाव्यात बोलताना यापुढे विकासकामे मीच मंजूर करणार, अशा प्रकारचा इशारा दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्य भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, शरद बुट्टे पाटील, विजय फुगे, आशा बुचके, प्रवीण काळभोर या सदस्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.

भाजप आणि शिंदे गटाच्या दहा सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन या संदर्भाचा गंभीर आरोप केला आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप शिंदे गटाला डावलून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या समर्थकांना जवळपास 800 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. ही कामे तात्काळ थांबावेत अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा गंभीर इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, एकूण निधीपैकी60ते 70 टक्के निधी अजित पवारांनी आपल्या समर्थकांनाच दिल्याचा आरोप करत शिंदे गट भाजपच्या पदाधिकाऱ्यांची केवळ पाच ते दहा टक्क्यांवर बोलवण करण्यात आल्याच देखील आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचा निधी जिल्ह्यात कुठलीही आपत्ती नसताना वापरण्यात आल्याचा आरोप देखील या निवेदनातून करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.