PCMC : शहरातील रेड झोनची मोजणी होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची मोजणी ( PCMC ) करण्यासाठी येणाऱ्या खर्चास  प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 17 मधील शिवनगरी, बिजलीनगर, प्रेमलोक पार्क भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने आणि विविध डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळेगुरव प्राथमिक शाळा क्रमांक 54 तसेच श्रीम. शेवंताबाई प्राथमिक शाळा क्रमांक 56, वैदु वस्ती या इमारतीची स्थापत्यविषयक देखभाल दुरूस्तीची कामे करण्यासाठी,  प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी, दत्तवाडी, काळभोरनगर व परिसरातील स्वच्छतागृहांचे नुतनीकरण व दुरूस्ती करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 19 गावडे कॉलनी,

उद्योगनगर, सुदर्शननगर व इतर परिसरामध्ये फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास,  प्रभाग क्रमांक 3 चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी व इतर परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरूस्ती एम.पी.एम पद्धतीने करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 23 मधील नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तसेच नवीन थेरगाव रुग्णालयामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Moshi : हरवलेल्या बालकाच्या पालकांची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घडवली भेट

आकुर्डी येथील दत्तवाडी विठ्ठलवाडी व इतर परिसरातील जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी व उर्वरित ठिकाणी जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 14 मधील डांबरी रस्त्यांची चरांची कामे करण्यासाठी तसेच सन 2023-24 करिता प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासनगर, भिमाशंकर कॉलनी, दत्तनगर भागातील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास,  प्रभाग क्रमांक 8 मध्ये खोदलेल्या चरांची डब्ल्यु.बी.एम व बी.बी.एम पद्धतीने दुरूस्ती करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक 14 काळभोरनगर व परिसरातील स्ट्रॉम वॉटर, फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 19 मधील महापालिका इमारतींची दुरूस्तीची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

क्रांतीवीर चापेकर वाडा येथे ऑडियो-व्हिडीओ व्हिज्वल, प्रोजेक्शन मॅपिंग व विविध डिजीटलायझेशन विषयक कामासाठी तसेच भाटनगर व इतर झोपडपट्टीमधील महापालिका इमारतींची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी आणि महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्राथमिक शाळांमधील ग्रंथालयाकरिता आवश्यक कथा पुस्तके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास,  सन 2023-24 साठी कासारवाडी गेटखालील परिसरात मुख्यालय स्तरावर डांबरी रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्यासाठी तसेच प्रभाग क्रमांक 25 वाकड, प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख भागातील रस्ते आवश्यकतेनुसार डब्ल्यु.एम.एम व एम.पी.एम पद्धतीने विकसीत करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक 14 मधील परिसरामध्ये स्ट्रॉम वॉटर लाईन टाकणे व पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रॉम वॉटर लाईनची दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 24 येथील रत्नदीप कॉलनी, मंगलनगर, गुजरनगर, लक्ष्मणनगर, संतोषनगर, सदाशिव कॉलनी व इतर आवश्यक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी आणि महापालिकेचे इ क्षेत्रीय कार्यालय, विद्युत विभागांतर्गत विविध कामांकरिता सन 2023-24 च्या तरतुदीमधील शिल्लक तरतुद वर्गीकरण करण्यासाठी तसेच मृत जनावरांची विल्हेवाट लावणे या लेखाशिर्षावर स्थायी अग्रिम सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात ( PCMC ) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.