Chinchwad : जय हरी बोलल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – जय हरी बोलल्यामुळे दोघांनी मिळून एका (Chinchwad) तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बिजली नगर चिंचवड येथे घडली.

प्रजा धुमाळ (वय 28) आणि त्याचा साथीदार (दोघे रा. बिजली नगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी जखमी तरुणाच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

PCMC : शहरातील रेड झोनची मोजणी होणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा त्यांच्या (Chinchwad) घराशेजारी असलेल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथे त्याच्या तोंड ओळखीचे आरोपी होते. फिर्यादी यांच्या मुलाने आरोपींना पाहून जय हरी असे म्हटले. त्या कारणावरून चिडून आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला हाताने मारहाण केली. तसेच डोक्यात सिमेंटची वीट मारून गंभीर दुखापत केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.