Pune : माझ्याकडे रागाने का बघतोस म्हणत महाविद्यालयीन तरुणाने काढला कोयता

एमपीसी न्यूज- पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात माझ्याकडे रागाने का बघितलेस असं म्हणत एका महाविद्यालयाने (Pune ) तरुणाने चक्क कोयता काढला आणि त्या तरुणाने कोयत्याने एकावर वार केले. नह्रे परिसरातील एशियन कॉलेजमध्ये 12 ऑक्टोबर रोजी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Ajit Pawar : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड ?

अथर्व उर्फ जयेश दोडके याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर सुनील निवडणे या तरुणाने या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मंगळवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीने तू माझ्याकडे काल कॉलेजमध्ये रागाने का बघितलेस असे म्हणत त्याला जाब विचारला. त्यावर फिर्यादीने मी तुझ्याकडे रागाने बघितले नाही असे उत्तर दिले असता आरोपीने त्याला हाताने मारहाण करत बॅगेतून लोखंडी कोयता बाहेर काढला. त्यानंतर फिर्यादीच्या गुडघ्यावर लोखंडी कोयता उलटा करून वार केले. पोलिसांनी (Pune ) या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.