Pune : पार्लरमध्ये काम देण्याच्या आमिषाने अल्पवयीन बांगलादेशी मुलीची बुधवार पेठेत विक्री

एमपीसी न्यूज – बांगलादेशातील एका 17 वर्षीय अल्पवयीन ( Pune) मुलीला पार्लरमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून या मुलीला बेकायदेशीररित्या भारतात आणले. त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीची विक्री करून तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : माझ्याकडे रागाने का बघतोस म्हणत महाविद्यालयीन तरुणाने काढला कोयता

कुंटणखाना मालकीण डोलमा राजू तमांग (वय 55, नेपाळ), दलाल महिला मारिया उर्फ सोनी ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही) आणि एका दलाल पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस हवालदार मनीषा पुकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बांगलादेशातील रहिवासी असलेली पीडित तरुणी अल्पवयीन आहे. दलाल महिला मारिया उर्फ सोनी आणि दलाल असलेला एक नेपाळी पुरुष या दोघांनी या मुलीला पार्लरचे काम देतो असे खोटे सांगून तिच्या अज्ञानपणाचा फायदा येऊन फुस लावत तिला बेकायदेशीर रित्या भारतात आणले.

त्यानंतर बुधवार पेठेत कुंटणखाना चालवणाऱ्या डोलमा राजू तमांग या महिलेकडे या तरुणाला ठेवून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. वेश्या व्यवसायातून मिळणारे पैसे आरोपींनी तिघांनी वाटून घेतले. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.