Pune : दरी पुलाजवळ ॲम्ब्युलन्सची आयशर ट्रकला धडक; रुग्णाचा मृत्यू तर आई-वडील गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- रुग्णाला घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या ॲम्ब्युलन्सने समोर असलेल्या आयशर ट्रकला (Pune)पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्ण असलेल्या अल्पवयीन मुलाचा  गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर चालकासह रुग्णवाहिकेतील इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

किरण अवताडे (वय 14) असे मृत्युमुखी पडलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर ॲम्बुलन्स चालक सद्दाम सुतार, अनिता अवताडे, अंकुश अवताडे आणि सुखदेव अवताडे हे गंभीर जखमी झाले आहेत. ॲम्बुलन्स चालकावर याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन मधुकर गवते यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा अपघात कात्रज बोगद्याच्या पुढे दरीपुला जवळील जांभूळवाडी रस्त्यावर मंगळवारी रात्री घडला.

प्रकरणी अधिक माहिती अशी की किरण अवताडे या अल्पवयीन मुलाला घेऊन ही ॲम्बुलन्स रुग्णालयाच्या दिशेने निघाली होती. भरधाव वेगात जात असताना ही ॲम्बुलन्स समोर असणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून जाऊन धडकली. यामध्ये ॲम्बुलन्समधील रुग्ण किरण अवताडे त्याचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेतील इतर गंभीर जखमी आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.