Pune : कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पाणी पुरवठा करण्यासाठी पुणे शहरात बसवणार 300 स्वयंचलित व्हॉल्व्ह

एमपीसी न्यूज – सर्व भागात व्यवस्थित पाणी पुरविण्यासाठी पुणे महापालिकेने स्वयंचलित व्हॉल्व्ह’ बसविण्याचे काम (Pune) सुरू केले आहे. पुणे शहरात सुमारे 300 व्हॉल्व्ह बसविण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे समान पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. यामध्ये 850 किलोमीटरची जलवाहिनी, 42 टाक्या बांधून पूर्ण, एक लाख 10 हजार पाण्याचे मिटर बसविणे यासह इतर कामांचा समावेश आहे. शहरात सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्येक भागातील व्हॉल्व्ह हाताने फिरवावे लागतात.

Pune : दरी पुलाजवळ ॲम्ब्युलन्सची आयशर ट्रकला धडक; रुग्णाचा मृत्यू तर आई-वडील गंभीर जखमी

त्यामुळे दिवसा आणि रात्री कर्मचाऱ्यांना या कामात गुंतून पडावे लागते. तसेच यामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे पाणी पुरवठा (Pune)करताना काही भागात जास्त दाबाने, जास्त वेळ पाणी देणे, तर काही सोसायट्यांना कमी पाणी सोडणे, दाब कमी ठेवणे असे प्रकार वारंवार घडतात.

हे अडथळे दूर करण्यासाठी समान पाणी योजनेतून शहरातील जुन्या आणि नव्या अशा 125 पाण्याच्या टाक्यांच्या मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविले जाणार आहेत. त्याला ‘अ‍ॅक्च्युएटर’ हे तंत्रज्ञान बसविले जाणार असल्याने ‘स्काडा’ प्रणालीला जोडले जाणार आहे.

पाणी सोडण्याची आणि बंद करण्याची वेळ निश्‍चित केल्यानंतर रिमोटद्वारे पाणी पुरवठ्यावर नियंत्रण केले जाईल. तसेच एखाद्या भागात पाण्याचा दाब कमी ठेवायचा की जास्त करायचा हे देखील (Pune) ऑनलाइन करता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.