Talegaon : सोमाटणे टोलनाका येथे भीषण अपघात

एमपीसी न्यूज – जुना पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात (Talegaon) झाला. यामध्ये दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी घडली.

Pune : कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय पाणी पुरवठा करण्यासाठी पुणे शहरात बसवणार 300 स्वयंचलित व्हॉल्व्ह

याबाबत माहिती अशी की, जुना पुणे मुंबई महामार्गावर मुंबई लेनवर सोमाटणे फाटा येथे कार (एमएच 12/व्हीके 8000) आणि मोपेड दुचाकीचा अपघात झाला कार आणि मोपेड दुचाकीची समोरासमोर धडक झाली यामध्ये दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून याची पोलीस अथवा रुग्णालय प्रशासनाने पुष्टी केलेली नाही.

अपघात झाल्यानंतर सोमाटणे फाटा येथे मुंबई लेनवर वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. तळेगाव दाभाडे (Talegaon) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.