Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास दीड कोटींचा गंडा

एमपीसी न्यूज – आत्तापर्यंत सर्वसामान्य नागरिक किंवा उच्च शिक्षित तरुण-तरुणींची आर्थिक फसवणूक (Pune) झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. मात्र पुण्यात चक्क एका निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाच चार जणांनी व्यवसायात तब्बल दीड कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

Talegaon : सोमाटणे टोलनाका येथे भीषण अपघात

याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राजेश वसंतराव कारंडे (वय 75), तीन महिला (सर्व रा. शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला आरोपींनी कास फूटवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते.

त्यानंतर तक्रारदार अधिकाऱ्याने वेळोवेळी आरोपींना 1 कोटी 55 लाख रुपये दिले. आरोपींनी त्यांना कंपनीतील समभागांचे प्रमाणपत्र दिले होते. आरोपींनी करारनामा केला. आरोपींनी कराराचा भंग करुन पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चतु:शृंगी पोलीस पुढील तपास करत (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.