Pune : विज्ञानाश्रम आयोजित वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- विज्ञान आश्रमचे संस्थापक डॉ. श्रीनाथ कलबाग यांच्या स्मृतिदिनानिमित्त 30 जुलै रोजी वैज्ञानिक प्रकल्पांचे खुले प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

विज्ञान आश्रमातील नवीन तांत्रिक प्रकल्प, नवीन सुविधा, शैक्षणिक प्रकल्प या बाबतची सविस्तर माहिती विज्ञान आश्रम , (पाबळ ता.शिरुर) येथील प्रदर्शनात मांडण्यात आली होती.

घरच्या, सोसायटीच्या कचऱ्याचे कंपोस्टिंग, शेतीसाठी माती -पाणी परीक्षण,यांत्रिक शेती, मत्स्य शेती, डिस्टील्ड वॉटर प्रकल्प, फॅब्रिकेशन लॅब, मूलभूत तंत्रज्ञान, सौर उर्जा, सोलर ड्रायर, पाण्याचा पुनर्वापर, फूड टेस्टिंग लॅब,फॅब्रिक डिझाईन,हस्तकला, माहिती तंत्रज्ञान, प्लास्टिक पायरॉलिसिस विषयक प्रकल्प मांडण्यात आले होते.

राज्यभरातून शाळा , मराठी विज्ञान परिषद सारख्या संस्थांचे सदस्य, शेतकरी, पाबळ ग्रामस्थांनी मोठया संख्येने भेट दिली. 21 संशोधनांचे पेटंट मिळविणारे युवा संशोधक अजिंक्य कोट्टावार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. विज्ञान आश्रम’चे संचालक डॉ योगेश कुलकर्णी यांनी स्वागत केले.’ग्रामीण भागाच्या विकासासाठी विज्ञान संशोधन,उद्योजकतेच्या माध्यमातून काम करण्याचे प्रशिक्षण या प्रकल्पांद्वारे दिले जाते ‘अशी माहिती योगेश कुलकर्णी यांनी दिली .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.