Talegaon Dabhade : कुंडमळा येथे इंद्रायणीच्या पात्रात वाहून गेलेला मुलगा अद्याप बेपत्ता

एमपीसी न्यूज- इंदोरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात पाय घसरून तोल गेल्याने एकोणीस वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) घडली होती. या घटनेला पाच दिवस उलटून देखील या मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही.

सौरभ नंदकुमार काळगे (वय 19 वर्ष रा. नाणेकरवाडी चाकण) असे या मुलाचे नाव आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरला असताना पाय घसरून तोल गेल्याने सौरभ पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, अद्याप त्याचा ठावठिकाणा लागू शकला नाही.

इंद्रायणी नदी तीरावरील कान्हेवाडी, सांगुर्डी, शेलारवाडी, देहूगाव, येलवाडी, खालुम्ब्रे या गावातील नागरिकांना आवाहन करण्यात आले असून सदर मुलगा नदीपात्रात किंवा नदीच्या कडेला आढळून आल्यास खालील मोबाईल क्रमांकावर पोलिसांना कळवावे.

हर्षल जाधव 9637351400, पोलीस निरीक्षक राजमाने 9421204777, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम 8652005888. प्रशांत सोरटे. 9552542854, सुधीर वाडीले 9832721976, नंदकुमार काळगे 9763438035, नितीन तारडे. 9881645460

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.