Pune : धक्कादायक…झोका खेळताना गळफास बसून सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – खिडकीला दोरी आणि टॉवेलच्या मदतीने सात वर्षीय मुलगी झोका खेळत ( Pune) होती.पण अचानक तिचा तोल गेला आणि तिला गळफास बसून मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील कात्रज परिसरातील आंबेगाव येथे घडली आहे.

अदिती दत्तात्रय कुलकर्णी ( वय 7, रा.आंबेगाव कात्रज) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागातील आंबेगाव परिसरात दत्तात्रय कुलकर्णी राहतात. दत्तात्रय आणि पत्नी हे दोघे कामावर गेल्यावर घरी अदिती आणि तिची आजी होती.

G-20 Council : जी – 20 परिषदेच्या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल कडून बसेस ची सुविधा

त्यावेळी अदिती हिने खिडकीला दोरी आणि टॉवेलच्या मदतीने झोका खेळण्यास सुरुवात केली.पण तिचा अचानकपणे तोल गेला आणि गळफास बसला.ही घटना आजीला दिसताच,आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आजुबाजुचे लोक घरामध्ये आल्यावर अदिती हिला जवळील रूग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.