PMPML : पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड मनपाच्या विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु

एमपीसी न्यूज –  पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील ( PMPML ) विद्यार्थ्यांना मोफत व सवलतीच्या दरातील अनुदानीत पासेसचे वितरण 15 जून पासून सुरु करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेतील इ. 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता 100% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी चे विद्यार्थ्यांना 75 % सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरु करण्यात आली असून पास साठी दि. 15 जून पासून सर्व आगारामध्ये व सर्व पासकेंद्रावर अर्ज वितरीत केले जात आहेत.

Pune : धक्कादायक…झोका खेळताना गळफास बसून सात वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विद्यार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात.

तसेच हे अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते पास शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे 25% रकमेनुसार चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील बँक ऑफ बडोदा चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरचे पासेस करीता अर्ज वितरण दि.15 जून पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येत आहे.

या योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील व पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. तसेच अधिक माहिती हवी असल्यास पालकांना ( PMPML )  व शाळांना 020-24545454 या क्रमांकावार संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.