Pune : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त दोन हजार विद्यार्थ्यांनी सादर केली योग प्रात्यक्षिके

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे आज (बुधवार) सकाळी (Pune) आठ ते दहा या वेळेत  ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ उत्साहात साजरा  करण्यात आला. संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी – विद्यार्थिनीनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

PMPML : पीएमपीएमएल कडून पिंपरी-चिंचवड मनपाच्या विद्यार्थ्यांकरिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. पी.ए.इनामदार , संस्थेचे सचिव प्रा. इरफान शेख,  मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम फंक्शन ग्राऊंड (आझम कॅम्पस) येथे झाला.  ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक डॉ. गुलझार शेख, शबनम पिरजादे,माजिद सय्यद यांनी संयोजन केले.

‘शारीरिक, मानसिक स्वास्थ जपण्याची योग परंपरा हजारो वर्षांपासून भारतात आहे. ही परंपरा घराघरात, जगभर पोहोचविण्याचे काम सर्वांनी करावे. सुदृढ , बलशाली भारताचे स्वप्न त्यातून साकार होईल ‘, असे प्रतिपादन डॉ.पी.ए.इनामदार यांनी यावेळी (Pune)  केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.