G-20 Council : जी – 20 परिषदेच्या प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएमएल कडून बसेस ची सुविधा

एमपीसी न्यूज – पुणे विद्यापीठ येथे जी – 20 परिषदेच्या (G-20 Council) माध्यमातून प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.सदरचे प्रदर्शन पाहण्याकरीता पुणे महानगरपालिकेकडील शिक्षण मंडळ यांनी प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांना आयोजित केलेले प्रदर्शन पाहण्याकरीता महामंडळाकडे बसेसची मागणी केलेली आहे.त्यानुसार पीएमपीएमएल तर्फे बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

Pune : ‘चौक’चा विजयी चौकार ; गर्दीचा चौथा आठवडा

उपलब्ध बसेस व त्यांचे वेळापत्रक खालील प्रमाणे

1) दिनांक 21 जून रोजी दुपारी बारा वाजता प्रदर्शन स्थळी विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरीता महामंडळाकडून 94 बसेसचे नियोजन केले आहे.

२) दिनांक 22 जून रोजी दुपारी बारा वाजता प्रदर्शन स्थळी विद्यार्थ्यांना ने-आण करण्याकरीता महामंडळाकडून 106 बसेसचे नियोजन करण्यात आले असून 2 दिवसामध्ये 200 बसेस पुणे मनपा शिक्षण मंडळ यांना देण्यात येणार आहेत.

मात्र या नियोजनामुळे  दोन दिवसामध्ये महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने बसेस मार्गावर न गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता  देखील वर्तविण्यात आली (G-20 Council) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.