Pune : स्वरसागर’ ग्रंथाला ‘मसाप’चा पुरस्कार

 एमपीसी न्यूज – स्वरसागर’ या हिंदी चित्रपट ( Pune ) संगीतातील गायकांवर चित्रपट संगीताचे अभ्यासक स्वप्निल पोरे यांनी लिहिलेल्या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अपर्णा मोहिले पुरस्कृत ‘सतीशचंद्र मोहिले स्मृती पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

Alandi : गावठाणा लगतची स्मशानभूमी तत्काळ आरक्षित जागेवरती स्थलांतरित करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

परिषदेच्या 118 व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 मे2023 रोजी सकाळी 11  वाजता एस. एम. जोशी फाऊंडेशनमध्ये होणार्‍या सोहळ्यात ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या हस्ते व ‘मसाप’चे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होईल.

ग्रंथ पुरस्कार विजेत्यांमध्ये एअर मार्शल भूषण गोखले, मुकुंद संगोराम, माधव वझे, राजू बाविस्कर, शिरीष भावे, यशोदा वाकणकर, मानसी फडके, प्रतिभा जगदाळे, सचिन पाटील, प्रा. हनुमंत पवार, श्रीकांत पाटील, मंदा खांडगे, स्वाती कर्वे, कल्याणी दिवेकर, विद्या देवधर, कीर्ती मुळीक, वर्षा तोडमल, मधुकर क्षीरसागर, शिवाजीराव देशमुख, आरती देवगावकर, अशोक इंदलकर, स्मिता दातार व अन्य लेखकांचा समावेश ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.