Alandi : गावठाणा लगतची स्मशानभूमी तत्काळ आरक्षित जागेवरती स्थलांतरित करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

एमपीसी न्यूज- आज आळंदी नगरपरिषदे समोर लाक्षणिक उपोषण चालू (Alandi1)आहे. हे  लाक्षणिक उपोषण पुणे जिल्हा अध्यक्ष -रिपब्लिकन सेनेचे संदीप रंधवे यांच्या वतीने चालू आहे.आळंदी शहरातील गावठाणा लगतची स्मशानभूमी तत्काळ आरक्षित जागेवरती स्थलांतरित करण्यासाठी नगरपरिषदेला वारंवार गेल्या वर्षभरात चार वेळा स्मरण पत्र  निवेदन देऊन पाठपुरावा करून सुद्धा नगरपरिषदेने जणीवपूर्वक इनामवर्ग ( 6 ब) च्या जागा  गिळंकृत करण्याचा लागोपाठ धडका चालविलेला आहे.
त्यांनी ज्या ठिकाणी नगरपरिषदे मार्फत स्मशानभूमी करिता जागा आरक्षित केलेली असताना सुद्धा त्या ठिकाणी स्मशानभूमी जाणीवपूर्वक स्थलांतरीत करण्याकरता विलंब केला जात आहे.त्या अनुषंगाने रिपब्लिकन सेने मार्फत आज सर्व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी,मित्र पक्ष तसेच आळंदीकर ग्रामस्थ यांच्या पाठींब्यासहीत उपोषण करत बसलेला आहे.
उमेश रानवडे,सुयोग कांबळे, अमित गडदे, रविंद्र रंधवे,किरण नरके, ज्ञानेश्वर घुंडरे,आनंद गंगावणे,अजय गायकवाड, रविंद्र गायकवाड, उषा शिंदे,उषा वाघमारे ,संदीप साळुंखे,दत्ताभाऊ गायकवाड इ. मान्यवर यावेळी उपस्थित राहून त्यांच्या या उपोषणास पाठींबा दिला.
उपोषण कर्त्याची प्रमुख मागण्या:-

1. तहसीलदार तथा आळंदी नगरपरिषद प्रशासक वैशाली वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात भाजी मंडई स्थलांतरीत करण्याचे बाबतीत बोलविण्यात आलेली बैठक यात सर्व्हे  क्रमांक 3 मूळ मालक म्हणून भाजी मंडईत 30 टक्के गाळे उदरनिर्वाहासाठी देणेचे मागणीस विलंब झाला असून लवकरात लवकर सदर ठिकाणी गाळे उपलब्ध करून देण्यात यावेत.
2. चौपाल इमारत ही इमारत ज्या कारणासाठी विकसित करण्यात आली आहे. त्याचसाठी वापर करणे बाबत मागणीकडे दुर्लक्ष झाले असून विकसित कारणासाठी वापर केला जावा.
3. आळंदी विकास योजना मंजूर दुसरी सुधारित विकास आराखडा यात ज्या ठिकाणी स्मशानभूमीचे आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्याच ठिकाणी अत्याधुनिक स्मशानभूमी साठीचे भूसंपादन करून स्मशानभूमीचे विकास काम हाती घेण्यात यावे.
4. आळंदी इंद्रायणी नदी लगतचा बस स्थानकातून दक्षिणेकडे जाणारा डी पी रोड तात्काळ विकसित करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करून मूळ मालकांना नुकसान भरपाई रेडिरेकनर चालू बाजार भावाचे पाच पट मोबदला देण्यात यावा.
5. इनाम वर्ग 3 च्या जागा परस्पर नगरपरिषदेने आपल्या ताब्यात ठेवलेल्या मूळ मालकांना तात्काळ परत देण्यात (Alandi1) याव्यात.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.