Pune : पुणेकरांच्या आरोग्य योजना महापालिकेने पुन्हा सुरु कराव्यात – मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील नागरिकांसाठी पाच वर्षांपूर्वी (Pune) पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना सुरू करण्यात आली होती. पण ही योजना बंद न करता पुनर्रचना करुन पुन्हा सुरू करावी.अशी मागणी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पंडित दिनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना आणि डॅा. श्यामा प्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरिक मोफत आरोग्य योजना या दोन्ही योजना गरजू पुणेकरांसाठी पुन्हा सुरु होणे आवश्यक आहे.

Maharashtra News : धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपचार घेणे होणार सुलभ; आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

या योजनांचा प्रशासनाने तातडीने अभ्यास करुन पुनर्रचना करावी. (Pune) जेणे करून शहरातील नागरिकांना याचा लाभ घेता येईल हीच अपेक्षा असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.