Pune : बायकोनेच दिली डॉक्टर नवऱ्याची सुपारी….

एमपीसी न्यूज – विभक्त राहणाऱ्या पतीची पत्नीनेच सुपारी दिली. मात्र ज्यांना सुपारी (Pune)  दिली त्यांनी या महिलेच्या पतीचे अपहरण केले आणि ठार मारण्याची धमकी दाखवून त्याच्या घरात जबरी चोरी केली. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वडकी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी प्रदीप मारुती जाधव (वय 48) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 10 अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी सिटीतर्फे रक्तदान शिबिर

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे जनावरांचे डॉक्टर आहेत. त्यांची आणि पत्नीची घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात केस चालू आहे. दरम्यान 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना फोन आला. वडकी गायकवाड रोड या ठिकाणी कुत्रे आजारी पडली असून त्याच्या उपचारासाठी बोलावून घेतले.
फिर्यादी त्या ठिकाणी केले असता दोन ते तीन लोकांनी नंबर प्लेट नसलेल्या चार चाकी गाडीत जबरदस्तीने त्यांना बसवले. त्यांचे अपहरण करत ठार मारण्याची धमकी दिली आणि पैशाची मागणी केली.

फिर्यादी यांच्या गळ्याला चाकू लावून तुझ्या नावाची तुझी पत्नी आणि मेहुण्याने सुपारी दिली आहे. तुला आम्ही संपून टाकणार आहोत. तू आम्हाला वीस लाख रुपये दिले तर आम्ही तुला सोडू. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही असे म्हणून फिर्यादीला राहत्या घरी घेऊन आले.
फिर्यादी कडून घराच्या चाव्या घेतल्या आणि जबरदस्तीने घरातील दागिने आणि रोख रक्कम अशी सत्तावीस लाख दहा हजार रुपये घेऊन गेले आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.