Pune : चालत्या गाडीवर मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला ; जीवितहानी टळली

एमपीसी न्यूज – पुण्यात येरवडा येथे मेट्रो स्टेशनच्या (Pune) कामदारम्यान मेट्रो स्टेशनचा लोखंडी पूलाचा मोठा भाग पुलाखाली असलेल्या कारवर कोसळला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना रात्री 8 च्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात जिवतहानी झाली नाही.

पुण्यात सध्या मेट्रोची  विविध भागात  कामे सुरू आहेत. येरवडा येथे देखील मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी एका पुलाचे काम सुरू असतांना पूलाचा लोखंडी भाग अचानक खाली कोसळला.

यावेळी खालून एक कार जात होती. हा लोखंडी भाग या कारवर कोसळला. यात कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, ही घटना कशामुळे घडली याची देखील चौकशी सुरू आहे.

Pune : बायकोनेच दिली डॉक्टर नवऱ्याची सुपारी….

या संदर्भात मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, येरवडा येथे महा मेट्रोच्या स्टेशनचे काम सुरू आहे. ही घटना कशामुळे घडली याला कोण जबाबदार. किती नुकसान झाले याची पाहणी करण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले असून या ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना केल्या जातील.

मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग जर नागरिकांवर कोसळला असता तर मोठी दुर्घटना टळली आहे. दरम्यान, महा मेट्रोने येरवडा येथे सुरू असलेल्या स्टेशनच्या कामाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करावे. तसेच कामाच्या दर्जाची तपासणी करावी. या घटनेला नेमका कोणाचा निष्काळजी कारणीभूत आहे, याचीही चौकशी करण्याचे आदेश दिले (Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.