Pune : नवले पुलाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू तर 22 जण जखमी 

एमपीसी न्यूज- पुणे बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ (Pune) असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहे.

 

Ralegansiddhi : जन आंदोलन संग्रहालयात 1980 ते 2020 पर्यंतच्या अण्णांच्या जनआंदोलनाचा इतिहास 

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार,पुणे बंगलोर महामार्गावरून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास 25 प्रवाशांना घेऊन  एमएच 03 सीपी 4409 निता ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी  बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करीत होती. त्याच दरम्यान एमएच 10 सीआर 1224 या साखरेची वाहतूक करणार्‍या ट्रकने पाठीमागून ट्रॅव्हल बसला जोरात धडक दिली.
या धडकेत बस आणि ट्रक पलटी झाल्याची घटना घडली.तर या घटनेमध्ये 22 जण जखमी झाले असून चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.तर या घटनेतील जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल (Pune) करण्यात आले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.