Ralegansiddhi : जन आंदोलन संग्रहालयात 1980 ते 2020 पर्यंतच्या अण्णांच्या जनआंदोलनाचा इतिहास

एमपीसी न्यूज- राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या निवास स्थानाच्या समोरच (Ralegansiddhi) जन आंदोलन संग्राहलय उभारले असून त्यामध्ये 1980 ते 2020 पर्यँत म्हणजेच या 40 वर्षा मध्ये अण्णांनी केलेली जनआंदोलनाची माहिती येथे देण्यात आली.

 

यामध्ये त्यांनी शासन दरबारी केलेल्या विविध कागदपत्रांचा समावेश आहे.तसेच अण्णांनी  केलेल्या त्या कार्याबद्दलची दखलेची  व प्रसार माध्यमांना दिलेल्या माहिती बद्दलची  विविध वृत्तपत्रांची कात्रणे सुद्धा या संग्रहालयात आहे.

 

Aalandi : इंद्रायणी प्रदूषणाबाबत अण्णा हजारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार

त्या संग्रहालया बाहेर आंबे,नारळ,चिंच व इतर विविध प्रकारचे वृक्ष आहेत. तसेच तहानलेल्या पक्षांसाठी सुद्धा तेथील वृक्षा खाली पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या तिथे येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतल्या शिवाय (Ralegansiddhi) राहत नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.