Pune : पत्रकारावर गोळीबार करणाऱ्या दोघांना शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज – पुण्यातील एका दैनिकाच्या वार्ताहरावर गोळीबार ( Pune ) केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, अन्य चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

प्रथमेश ऊर्फ शंभु धनंजय तोंडे (वय 20, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय 22, रा. नांदेड गाव) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, तीन कोयते, चार दुचाकी, तीन मोबाईल जप्त केले आहेत. आर्थिक व्यवहारातून आरोपींनी सुपारी घेऊन हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pune : पुन्हा एकदा तयार करण्यात आले पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 27 मे रोजी रात्री दुचाकीवर घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी फिर्यादीवर मिरची पावडर टाकून कोयत्याने मारण्याची धमकी दिली. यानंतर 11 जून रोजी रात्री महर्षीनगर परिसरात आरोपींनी फिर्यादीच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. परंतु गोळी डोक्याच्या बाजूने गेली. याबाबत स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान या गुन्ह्यातील दोघेजण पेरणेफाटा, लोणीकंद परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली. तर, साथीदारांना धायरी, नांदेड गावातून ताब्यात घेतले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर, वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे यांच्या पथकाने ही कारवाई ( Pune ) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.