Pune : पुन्हा एकदा तयार करण्यात आले पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट
एमपीसी न्यूज – पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आणखी एकदा बनावट( Pune) फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. सायबर चोरट्यांच्या रडारवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख आहेत. त्यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करत नागरिकांची फसवणूक करण्याचा सायबर चोरट्यांचा डाव आहे.
Pimpri : पाणी कपातीची टांगती तलवार ; पवना धरणात फक्त 18 टक्के पाणीसाठा
राजेश देशमुख यांचे फोटो वापरत तसेच आयएएस असे लिहीत बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. या आधी देखील राजेश देशमुख यांच्या नावे फेक अकाउंट बनवल्याचे समोर आले होते. पोलिसात तक्रार करून सुद्धा जिल्हाधिकारी देशमुख यांचे खोटे अकाउंट बनवले जात ( Pune) आहे.
सायबर चोरट्यांनी दोन महिन्यात पाच ते सहा वेळा देशमुख यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या आहेत .
जिल्हाधिकारी देशमुख यांनी त्यांच्या कुठल्याही बनावट अकाउंट ला बळी पडू नका असे आवाहन याआधी देखील केले आहे .