Pune : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – वडगाव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक (Pune) तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि. 13) केले जाणार आहे. त्यामुळे वडगाव जलकेंद्र परिसर, राजीव गांधी पंपिंगवरील सर्व भागांमधील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. 14) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा दणका;  एकाच दिवशी करण रोकडे, बाबा शेख, अनिल जाधव टोळ्यांवर मोका

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

वडगाव जलकेंद्र परीसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बहुक, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी. येवलेवाडी.

राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुटुक आवेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी.. सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर. इ.

त्यामुळे सोमवार (दि. 10) ते बुधवार (दि. 12) व शुक्रवार (दि. 14) ते रविवार (दि. 26) पर्यंत संपूर्ण भागाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या भागासाठी पाणीकपात असणार नाही. सोमवार (दि. 27) पासून पूर्वीच्या नियोजनासह सर्व भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार (Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.