Maharashtra News : आता विदेशी कैद्यांना देखील मिळणार व्हिडीओ कॉलिंगची सुविधा; कारागृह प्रशासनाचा निर्णय

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये असलेल्या (Maharashtra News)  विदेशी कैद्यांना व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विदेशी कैद्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून ही सुविधा पुरवून मानवी हक्कांचे सरंक्षण करणे गरजेचे आहे असा अभ्यासपूर्ण निष्कर्ष काढून कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी याबाबत 4 जुलै रोजी कारागृह निरीक्षकांना आदेश दिले आहेत. व्हिडीओ कॉलिंगची सुविधा पाकिस्तानी, बांग्लादेशी व अतेरिकी कारवायातील बंदी वगळता इतर विदेशी बंदींना दिली जाणार असल्याचेही त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या बंदींना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ePrisons प्रणालीद्वारे Video Calling सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु ही सुविधा अद्याप विदेशी बंदींना देण्यात येत नव्हती. राज्यातील विविध कारागृहात आज रोजी 637 बंदी दाखल आहेत. विशेषता मुंबई, नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंदींचे प्रमाण अधिक आहे.

Pune : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

विदेशी बंदींचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येवू शकत नसल्याने विदेशी बंदींना कायदेशीर मदत मिळण्यास व कारागृहातून सूटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी कैद्यामध्ये नैराश्य वाढू लागते त्यामुळे कारागृह प्रशासनाला सदर बंदींवर सतत निगराणी ठेवावी लागते. ही सुविधा विदेशी बंदींना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल व कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. त्यामुळे कारागृहातील बंदींची गर्दी थोड्या फार प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. व्हिडीओ कॉलिंगची सुविधा परिणामकारकपणे यशस्वी करण्याची जबाबदारी डॉ जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह मुख्यालय यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

कारागृहात विशेषतः नायजेरियन, बांग्लादेश कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ यांसह एकूण 44 देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन दाखल झालेले आहेत.

पक्क्या कैद्यांमध्ये 29 पुरुष कैदी आणि तीन महिला कैदी आहेत. तर कच्च्या कैद्यांमध्ये 494 पुरुष कैदी आणि 111 महिला कैदी आहेत. राज्यातील विविध कारागृहांमध्ये एकूण 523 पुरुष कैदी तर 114 महिला कैदी (Maharashtra News)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.