Maharashtra : आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत ‘हे’ घेतले निर्णय

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दुपारी तीन वाजता (Maharashtra )लागणार आहे. त्यापूर्वी राज्य  सरकारने आठवड्यातील तिसरी मंत्रीमंडळ बैठक आज घेतली. त्यामध्ये  विविध निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकील निर्णय

राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी ( उद्योग विभाग), तात्पुरत्या स्वरूपातील 64 वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित (Maharashtra )करणार ( वैद्यकीय शिक्षण विभाग), मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास. दंड सुद्धा वाढविला( गृह विभाग), 138 जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता.

(विधि व न्याय), संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमी स्थापणार (सांस्कृतिक कार्य), शासकीय, निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण (सांस्कृतिक कार्य),  विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ. 50 कोटी भागभांडवल ( इतर मागास), पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडवलात भरीव वाढ. (पशुसंवर्धन विभाग),हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार.

 

रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली “मॅनहोलकडून मशीनहोल” कडे योजना (सामाजिक न्याय विभाग). संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार. सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार (गृह विभाग), राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार (गृह विभाग), ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ. 50 कोटी अनुदान.
Talawade : रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, दोघांना अटक

( परिवहन विभाग), भुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप (महसूल विभाग),  संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार. गुन्ह्यांची वेगाने उकल करणार (गृह विभाग),  वृद्ध साहित्यिक व कलाकारांना 5 हजार रुपये मानधन (सांस्कृतिक कार्य), राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 20 कोटी अतिरिक्त निधी मंजूर ( सामान्य प्रशासन विभाग). श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल व वन)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.