Talawade : रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाचा जाब विचारायला (Talawade) आलेल्या रिक्षा चालकाला दोघांनी कोयत्याने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे.  ही घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी तळवडे चौकात घडली.

याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी विशाल अभिमन्यू जाधव (वय 19) व अभिषेक बाबु जाधव (वय 19, दोघे राहणार तळवडे) यांना अटक केले आहे. याप्रकरणी चंद्रशेखर रावसाहेब सुकळे (वय 23 रा. निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.

Yerawada Fire Update News : येरवडा येथे कारखाना व गोडाऊनला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची रिक्षा घेवून भाडे भरण्यासाठी थांबले होते. यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी व त्यांचे भाऊ हे जाब विचारण्यासाठी गेले (Talawade) असता आरोपींनी कोयत्याने फिर्यादीला मारहाण करत गंभीर जखमी केले. यावेळी फिर्यादीच्या भावाला देखील मारहाण कऱण्यात आली. यावरून देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.