Chakan: वेगात कंटेनर पार्क करने बेतले  चालकाच्या जिवावर, लोंखडी पाईपचा पोटाला दाब बसून चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज –  वेगात येत कंटेनर सारखे अवजड वाहन पार्क (Chakan)करने कंटेनर चालकाच्याच जिवावर बेतले आहे, लोखंडी पाईपला धडकून पाईपने पोटाला जोरदार  दाब बसल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे. हा विचित्र अपघात 5 फेब्रुवारी रोजी चाकण येथील राणूबाई मळा येथे घडला होता.
याप्रकरणी रविंद्र बाळासाहेब मेदनकर (वय 36 रा. चाकण) यांनी गुरुवारी(Chakan) (दि.15) फिर्याद दिली आहे. यावरून मयत कंटेनर चालक धर्मेंद्र  जयमंगल राम (वय 36 रा. तळेगाव चाकण रोड, चाकण) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कंटेनर चालवत होते. त्याने वेगात कंटेनर आणत ते पार्क करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडी वळवत असताना कंटेनर लोखंडी पाईपच्या शेडला धडकले. यावेळी लोखंडी पाईप या सरळ कंटेनरचा काच फोडून आत घुसला.

 

यावेळी मयत धर्मेंद्र यांच्या पोटाला या पाईपचा जबर दाब बसला. यातच उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. यावरून चाकण पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.