Nigdi : जे येते, त्यात करिअर करावे – प्रशांत दामले

एमपीसी न्यूज – लहानपाणापासून गाणे कानावर पडत होते. त्यामुळे लहान(Nigdi) पणापासून मला गाण्याची आवड निर्माण झाली. शास्त्रीय गाण्याचा मला गंध नाही. जे येते, त्यात करिअर करावे. मला जेवढे, येते तेवढेच मी गातो.

हातात आहे, तेवढे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावे. गेलेल्या गोष्टीचे (Nigdi)दुख करत बसू नाही, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. हातातील वेळ, संधीचा फायदा घेत दुस-याच्या पोटावर पाय न देता यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. समान नागरी कायदा गरजेचा असल्याचेही ते म्हणाले.

अनुष्का स्त्री कलामंच, श्री समर्थ युवक प्रतिष्ठान प्राधिकरण आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आकुर्डीतील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहात शुक्रवारी रात्री हास्यपर्वणी सुख म्हणजे नक्की काय असतं! हे सांगणारे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची मुलाखत चांगलीच रंगली. अभिनेते हेमंत बर्वे यांनी मुलाखत घेतली. आयोजक माजी नगरसेवक अमित गावडे, अनुष्का स्त्री कलामंचाच्या अध्यक्षा शर्मिला महाजन, पुना गाडगीळ अॅड सन्सच्या स्मिता मुधोळ, डायरेक्टर फायनान्स मोनिका देसाई आदी उपस्थित झाले. स्त्रीयांच्या शिक्षणासाठी कार्य करणा-या कास्प संस्थेचा विशेष सत्कार करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे पुनर्वसन करणा-या स्नेहवनमधील अर्चना देशमाने, अशोक देशमाने यांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

दामले म्हणाले की, मोबाईल नसल्यामुळे पूर्वी संवाद खूप होत होता. आता संवाद कमी झाला आहे. त्यामुळे मोठ्या लोकांशी बोलताना काय सूर असावा, कोणत्या शब्दात बोलले पाहिजे, याची जाण आताच्या पिढीला नाही. आजची पिढीदहापट पुढे आहे. हा आनंदाचा भाग आहे. परंतु, इतक्या वेगाने पुढे जाऊ नये असे मला वाटते. सून मुलीसारखी आणि सासू आईसारखी म्हणने सोपे आहे.

Talawade : रिक्षा चालकाला कोयत्याने मारहाण, दोघांना अटक

परंतु, प्रत्यक्षात उतरणे खूप कठिण असते. गाण, अभिनय आणि आपल्याला आवडणारी गोष्ट सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. अभ्यासात मला फारशी गती नव्हती. आई-वडिलांना बरे वाटावे म्हणून अभ्यास करायचो, महाविद्यालयीन जीवनातच नाटकाची चटक लागली. आई वडिलांसाठीच बीएसटीमध्ये नोकरी केली. माझा टायपिंगचा स्पीड उत्तम होता. परंतु, नाटकात काम करणे, गाणे गाण्यावर माझा फोकस होता.

कलाकार, स्क्रीप्ट कशी आहे यावर नाटक कसे हे ठरते. तसेच नाटकातील प्रत्येक सीनमध्ये काहीतरी घटना घडणे महत्वाचे असते. ज्योतिषाऐवजी आई-वडिलांचा सल्ला घेतला पाहिजे. ज्योतिषावर माझा अविश्वास नाही.

पण, मी कामधंदा सोडून जाणार हे योग्य नाही. भविष्यावर माझा 50 टक्के विश्वास आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, राजा गोसावी, राजदत यांनी मला खूप शिकविले. हजररबाबपणाचा आनंद तेवढ्या पुरताच असतो. त्या क्षणाचा आनंद असतो.

मी दुख करत नाही. आयुष्यात एकदाच मनुष्याचा जन्म मिळतो. त्यामुळे सचोटीचे काम करावे. हातातील वेळ, संधीचा फायदा घ्यावा. दुस-याच्या पोटावर पाय न देता यशस्वी होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. थांबायचे कधी, कुठे या गोष्टी कळायला पाहिजेत. काय करु नये हे सांगण्याअगोदर काय करावे हे मुलांना सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नातू यांनी केले. तर, वृंदा गोसावी यांनी आभार मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.