Alandi : कर्ज थकवल्याचा बहाणा करून महिलेची बदनामी करत फोट मॉर्फींगची धमकी

एमपीसी न्यूज – कर्जाची परतफेड करत नाही (Alandi) अशी बतावणी करत महिलेच्या नातेवाईकांमध्ये बदनामी करून 5 लाख दिले नाहीत तर फोटो मॉर्फ करून बदनामी करणार असल्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून हा सारा प्रकार 6 मार्च रोजी आळंदी गाव येथे घडला.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.15) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून 9082172991 याचा वापरकर्ता मनि स्वामी रोजरिओ ऊर्फ मायकल व 9867661986 या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

Chinchwad : प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली दिल दोस्ती दुनियादारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईकांना आरोपीने फोन केले. त्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ यांनी कर्ज घेतले असून ते थकवले आहे. ते कर्ज बुडवे आहेत अशी बदनामी केली. फिर्यादी यांना ही बाब सोडल्यानंतर (Alandi) फिर्यादी यांनी आरोपीचा नंबर नातेवाईकांकडून घेवून कॉल केला.

यावेळी त्यांनी कोणती बँक, कोणते कर्ज मी कर्ज घतलेले नाही अशी विचारणा केली असता आरोपीने बँकेचे नाव न सांगता मी मायकल आहे , तू मोठ्या घरात रहाते, मी तुझ्या नातेवाईकांना फोन केले आहेत. तू मला 20 मार्च पर्यंत 5 लाख रुपये दिले नाहीत तर तुझे फोटो मॉर्फ करून सोशल मीडिया व नातेवाईकांना पाठवेन अशी धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.