Pune : सुप्रिया ताई कोणतही ट्विट करताना दुसरी बाजू पण पहा- माधव जगताप

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे (Pune ) अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी फेरीवाल्यां विरोधात कारवाई करताना वडापाव स्टॉलवर लाथ मारल्याचा व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे त्यावर ट्विट करित भूमिका मांडली. सदर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी,अशी मागणी केली त्यांनी  केली.यावरअतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप म्हणाले की,सुप्रिया ताई कोणतही ट्विट करताना दुसरी बाजू पण पहा.

सुप्रिया सुळेंनी ट्विट मध्ये म्हटले की,पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांचं वागणं पाहून सखेद आश्चर्य वाटलं.महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी.सदर अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.अशी मागणी केली.

PCMC : उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश देताच जलवाहिन्याच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती

यावर  अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप  म्हणाले की, पुणे शहरातील अनेक भागात आमचे अधिकारी,कर्मचारी कारवाईसाठी जातात. त्यावेळी अनेक ठिकाणी वादाचे प्रसंग घडतात. अनाधिकृत फेरीवाले आम्हाला शिवीगाळ करतात.आम्ही त्यांना वारंवार सांगून देखील अतिक्रमण हटविले नाही.तर त्यांच्यावर कारवाई करीत आहोत.तसेच जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.त्या संबधित व्यक्तीला वारंवार सांगून देखील स्टॉल काढला नाही. अतिक्रमण काढताना ती कृती झाली.तसेच ती जर माझी चूक असेल तर माझ्यावर जरूर कारवाई करावी.
पण या प्रकरणी वेगळं वातावरण निर्माण केले जात आहे.सुप्रिया ताई तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि आम्ही देखील अधिकारी आहे.त्यामुळे ज्यावेळी तो व्हिडीओ समोर आला.त्या दरम्यान आमच्याकडे चौकशी करणे अपेक्षित होते.पण तुम्ही ट्विट केले त्यामुळे एकच वाटते की, कोणतही ट्विट करताना दुसरी बाजू देखील पहिली पाहिजे.तसेच ते पुढे म्हणाले की,पुणे शहर अतिक्रमण मुक्त होण्यासाठी यापुढे देखील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे (Pune ) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.