Bhosari : सोन्याच्या बिस्कीटाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज – तुमच्याजवळचे ( Bhosari )  दागिने व रोख रक्कम द्या त्या बदल्यात 15 तोळे वजनाचे बिस्कीट देतो म्हणत दोघांनी 65 वर्षीय महिलेचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.15) दुपारी भोसरी येथील मच्छी मार्केटजवळ घडली.

याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : सुप्रिया ताई कोणतही ट्विट करताना दुसरी बाजू पण पहा- माधव जगताप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या चाकणकडे जाण्यासाठी बसची वाट बघत थांबल्या होत्या. यावेळी आरो फिर्यादी यांच्या जवळ आले. त्यांनी बोलत-बोलत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर तुम्ही आम्हाला तुमच्या जवळचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम द्या, त्या बदल्यात 15 तोळे वजनाचे सोन्याचे बिस्कीट घ्या, असे आमिष दाखविण्यात आले.

फिर्यादी यांना विश्वास बसला व त्यानी त्यांच्याकडील 70 हजार 300 रुपयांचे दागिने व रोख रक्क काढून घेत त्यांना पिवळ्या रंगाचे बिस्कीट दिले. मात्र ते बिस्कीट खोटे असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. भोसरी पोलीस याचा पुढील तपास ( Bhosari ) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.