Alandi : लग्न मांडवातून दागिन्यासह पर्स चोरीला

एमपीसी् न्यूज –  लग्न मांडवात लग्नाचे विधी सुरु असताना (Alandi ) दागिन्यांसह एका महिलेची पर्सही चोरीला गेली आहे. हि घटना 12 मे रोजी आळंदी येथील  राधाकृष्ण मंगलकार्यालयात घडली.

याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari : सोन्याच्या बिस्कीटाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने केले लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लग्न मांडवात कन्यादानाचा विधी सुरु असताना स्टेजवरील खुर्चीत बसल्या होत्या.यावेळी त्यांनी त्यांची पर्स खुर्चीच्या खाली ठेवली. चोराने याच संधीचा फायदा घेत पर्स पळवली. या पर्समधील सोन्याचे मोठे मंगळसुत्र, छोटे मंगळसुत्र, कानातली सोन्य़ाची फुले, रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 67 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास (Alandi ) करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.