Pune : साजरा होणार ‘पेपरवीक’

पुणे हातकागद संस्थेच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – पुण्यातील हातकागद संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. 19 मे ते बुधवार दि. 24  मे दरम्यान ‘पेपरवीक’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हातकागदाशी संबंधित विविध कार्यशाळा, ब्लॉक प्रिंटिंग, स्केचिंग, डूडलिंग, हातकागद बनविणे, बुक बाईंडिंग, ओरिगामी यांविषयीच्या कार्यशाळांचे आयोजन(Pune) करण्यात आले. 

अशा पद्धतीने साजरा करण्यात येणारा ‘पेपरवीक’ हा पहिलाच प्रयत्न असून शिवाजीनगर येथील कृषी विद्यापीठाजवळील पुणे हातकागद संस्थेच्या आवारात सकाळी 11 वाजल्यापासून ‘पेपरवीक’ अंतर्गत अनेकविध कार्यशाळा, प्रदर्शने आणि प्रात्यक्षिके यांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे सर्व उपक्रम सशुल्क असून उपक्रमात सहभागी होण्यासाठी 10  वर्षांपुढील व्यक्तीस रु. 250  तर 10  वर्षांखालील मुलांना रु. 150 इतके शुल्क आकारण्यात येईल. याबरोबरच कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रती कार्यशाळा रु.1000 (सर्व साहित्य समाविष्ट) तर तीन कार्यशाळांसाठी एका व्यक्तीस रु. 2500  (सर्व साहित्य समाविष्ट) इतके शुल्क आकारण्यात येणार आहे.
हातकागदाबद्द्ल जास्तीत जास्त नागरिकांना माहिती व्हावी, त्याचा वापर करून आपली कला त्यावर उतरावी आणि एकत्रितपणे ती साजरी व्हावी, या उद्देशाने  अशा प्रकारे ‘पेपरवीक’ साजरा करण्यात येणार आहे.  यामध्ये प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी खास कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सुप्रसिद्ध कलाकार आदित्य शिर्के यांचे ‘मास्टरक्लास आर्ट वर्कशॉप’ हे या पेपरवीकचे वैशिष्टय असेल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.