Kishore Aware : किशोर आवारे समर्थकांचा आज संध्याकाळी मोर्चा

एमपीसी न्यूज – दिवंगत नेते किशोर आवारे यांच्या हत्येतील खऱ्या सूत्रधारांना अटक करून कठोर ( Kishore Aware) शिक्षा व्हावी या मागणीसाठी किशोर आवारे समर्थक  आज (दि. 17) मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा बुधवारी सायंकाळी पाच वाजता मारुती मंदिर चौक ते तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन असा काढला जाणार आहे.

किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील खऱ्या सूत्रधारांना अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आहे. मोर्चात तळेगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किशोर आवारे यांच्या आई, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे व सागर संभाजी दाभाडे यांनी केले आहे.

Maharashtra News : राज्यातील तरुणांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

12 मे रोजी किशोर आवारे नगरपरिषद कार्यालयात आले असता त्यांच्यावर चार हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला करत त्यांची हत्या केली. त्यानंतर पळून गेलेल्या मारेकऱ्यांना पोलिसांनी 24 तासात अटक केली. त्यासह मारेकऱ्यांना मदत करणाऱ्या एकाला अटक केली असून त्यांना कथित सुपारी देणाऱ्यास देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यानंतरही या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला जात ( Kishore Aware) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.