Pune : पतीला धडा शिकवण्यासाठी महिलेची बॉम्बने कॅब उडवून देण्याची धमकी

एमपीसी न्यूज-दुसरे लग्न करणाऱ्या पतीला धडा शिकवण्यासाठी ( Pune) एका महिलेने पती काम करत असणाऱ्या कंपनीची कॅब बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या महिलेने तसा ईमेल कंपनीच्या अकाउंट वर पाठवला. यानंतर एकच खळबळ उडाली. हा ईमेल पाहताच कंपनी व्यवस्थापनाने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. हा त्यानंतर पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून कंपनीच्या सर्व कॅबची पाहणी केली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणात कुठलेही तथ्य नसल्याचे आढळून आले. त्यानंतर अफवा पसरवणाऱ्या या महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

फरहीन अलरुमान शेख (वय 33, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या या महिलेचे नाव आहे. खराडी येथील ऑल स्टेट कंपनीच्या व्यवस्थापकाने चंदन नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 11 जून रोजी सायंकाळी हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ऑल स्टेट या कंपनीत आरोपी महिलेचे पती अलरुमान शेख कामाला आहेत. त्यांनी दुसरे लग्न केले. यावरून पहिल्या पत्नीत आणि त्यांच्या सतत भांडण व्हायचे. या संपूर्ण प्रकारातून पतीला तर घडवण्यासाठी आणि त्याची नोकरी जावी या हेतूने आरोपी महिलेने तो काम करत असलेल्या कंपनीच्या मेलवर पतीचा मेल आयडी वापरून मेल पाठवला.
त्यात कंपनीचे बिगर मुस्लिम कर्मचारी प्रवास करत असलेल्या कॅबला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकारानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने पाहणी केली असता यात कुठलेही तथ्य आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या महिलेला अटक ( Pune) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.