Chinchwad : पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून पेव्हर ब्लॉकने मारहाण

एमपीसी न्यूज –  पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून  दोघांनी विटेने व पेव्हर ब्लॉकने तिघांना मारहाण (Chinchwad) केली आहे. हा प्रकार चिंचवड स्टेशन जवळील पुलाखाली सोमवारी (दि.12) रात्री घडली आहे.

याप्रकऱणी पोलिसांनी तुषार ऊर्फ सनी सुरेश गायकवाड (वय 24 रा.चिंचवड) व आदेश ऊर्फ भैय्या बप्पा ऊर्फ सुरेश गायकवाड (वय 23 रा. चिंचवड) यांना अटक केली असून रणजीत राजू शेट्टी (वय 28 रा.चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Pune : वारकरी मसाज सेवेने दिवेघाटात थकलेल्या पायांमध्ये भरले चैतन्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ व एक मित्र हे तिघे पुलाखाली बसले असताना आरोपी दुचाकीवरून आले  त्यांनी फिर्यादीचा मावस भाऊ साईप्रसाद याच्याकडे 500 रुपये मागितले. यावेळी साईप्रसाद ने दिले नाहीत याचा राग येवून आरोपींनी पेव्हर ब्लॉक व विटांनी मारहाण केली फिर्यादी यांचा मित्र तेथे वाचविण्यास गेला असता त्याला देखील मारहाण कऱण्यात आली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (Chinchwad) दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.