Chincholi : सावत्र बापाने मुलीला भिंतीवर आपटत केला खून   

एमपीसी न्यूज – चिंचोली येथे अत्यंत चिड अणणारी व दुर्दैवी घटना (Chincholi)  घडली आहे. सावत्र बापाने तीन वर्षाची मुलगी रडत आहे म्हणून तिला बेदम मारहाण करत तिला थेट भिंतवर आपटून तिचा जिव घेतला आहे. हा धक्कादायक प्रकार चिंचोली येथे सोमवारी (दि.12) घडला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी नराधम बाप महादेव नारायण गायकवाड (वय 22 रा. चिंचोली) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकऱणी पोलीस हवालदार किशोर बबनराव दुतोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

Chinchwad : पाचशे रुपये दिले नाहीत म्हणून पेव्हर ब्लॉकने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची गुड्डी (वय 3 वर्ष) ही रडत होती. त्याला याचा राग आला व त्याने मुलीच्या पोटात बुक्क्यांनी मारहाण करत तिला उचलून भिंतीवर आपटत तिला ठार मारले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून देहुरोड पोलीस पुढील तपास करत (Chincholi)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.