Dehuroad Corona News : देहूरोडमधील ‘हा’ भाग ‘मायक्रो कंटेनमेंट झोन’ घोषित

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोनमेन्ट बोर्ड हद्दीतील चिंचोली, थॉमस कॉलनी, झेंडे मळा, पारशीचाळ, दत्तनगर, संकल्प नगरी (मधुर सोसायटी, रॉयल कॉम्पलेक्स), शिवाजीनगर (मारीमाता मंदिर, राजू स्टॅम्प व्हेंडर ), एलोरा रेसीडन्सी सोसायटी या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे हा भाग आजपासून (मंगळवार. दि. 6) मायक्रो कंटेनमेंट झोन (Micro Containment Zone) म्हणून जाहिर करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच हा भाग हा नियंत्रण कक्षाखाली घेण्यात आला आहे. या भागामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. संपूर्ण चिंचोली, थॉमस कॉलोनी (भाटिया बिल्डिंग, के के इलेक्ट्रोनिक्स), झेंडे मळा, पारशीचाळ, दत्तनगर, संकल्प नगरी (मयुर सोसायटी, रॉयल कॉम्पलेक्स), शिवाजीनगर (मरीमाता मंदिर, राजू स्टॅम्प व्हेंडर ), एलोरा रेसीडन्सी सोसायटी हा भाग ‘सील’ करण्यात आला असल्याची माहिती देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर रामस्वरूप हरितवाल यांनी दिली.

हद्दीतील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व कोणीही घरातून बाहेर पडू नये. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.