_MPC_DIR_MPU_III

Bhosari Crime News : विवाहितेला नांदवायला पाठवत नाही म्हणून माहेरच्या लोकांना मारहाण

0

एमपीसी न्यूज – विवाहितेला नांदवायला पाठवत नाही म्हणून सासरकडील मंडळींनी माहेरी येऊन विवाहितेच्या नातेवाईकांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 4) सायंकाळी सदगुरूनगर, भोसरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_IV

गणेश अरूण आढाव (वय 28), महेश अरूण आढाव (वय 35), वैभव रमेश भोंडवे (वय 21), अरुण आढाव (वय 60, सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

संतोष शिवाजी चौधरी (वय 42, रा. सद्‌गुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी चौधरी हे आपल्या दोन मुली आणि पत्नीसह घरात होते. त्यावेळी त्यांचा जावई गणेश आढाव हा नातेवाईक आरोपींसोबत तिथे आला.

फिर्यादी चौधरी यांची मुलगी सुवर्णा ही तिच्या पतीकडे नांदायला जात नसल्याच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या कुटूंबास शिवीगाळ केली. फिर्यादी आणि त्यांचा भाऊ बापू चौधरी याला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

फिर्यादी यांचा व्याही अरुण आढाव याने फिर्यादी यांचा भाऊ बापू यास डोक्‍यात काठीने मारून जखमी केले. तसेच तुमच्याकडे पाहून घेऊ, अशी धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment