Akurdi : मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मोहननगर, कळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, (Akurdi) शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पालिकेकडे केली आहे.

‌याबाबत पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर वाढला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेत खूप जोर जोरात भुकंतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांचा निद्रानाश होतो. लहान मुले घाबरून जागे होतात. हे मोकाट कुत्रे लहान मुले, महिलांच्या अंगावर गुरगुरुन धावतात. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ravet : सून आणि तिच्या आईच्या त्रासाला कंटाळून वृद्ध दांपत्याची आत्महत्या

या परिसरातील सेकंन्ड,थर्ड शिपला जाणाऱ्या, येणाऱ्या कामगारांच्या (Akurdi) वाहनाच्या मागे हे कुत्रे धावतात. प्रसंगी चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे कामावर येणारे जाणारे कामगार आपले वाहन जोरात पळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे यापुर्वी अनेक लहान मोठे अपघात झाले आहे. यापुढे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.